आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Benefit To Farmers, Sharad Pawar Critised On Modi Policy

शेतक-यांच्या हाती ‘धुपाटणे’, शरद पवार यांची मोदींच्या धोरणांवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘ऊस उत्पादकांसाठी केंद्र सरकारने ६००० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पैसे बँकांनी कर्जाऊ द्यावेत व त्याचे एक वर्षाचे व्याज केंद्र सरकार देणार आहे. मात्र हे पैसे देण्यासाठीचे निकष पाहता बँका ऊस उत्पादकांना पैसे देऊच शकत नाहीत. त्यामुळे या पॅकेजमधून एक नवा पैसाही ऊस उत्पादकांना मिळणार नाही,’ अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी माेदी सरकारच्या पॅकेजचे पोस्टमाॅर्टेम केले.
पत्रकार परिदेत पवार म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील फारच कमी साखर कारखाने ब-या स्थितीत आहेत तर बाकीचे शाॅर्ट मार्जिनमध्ये चालतात. अनेक बॅंकाही शार्ट मार्जिनमध्ये आहेत. त्यांना कर्ज देऊ नये असा नाबार्डचा आदेश आहे. अशा परिस्थितीत ६ हजार काेटींचे कर्ज त्यांच्यापर्यंत पाेहाेचू शकतच नाही, याकडेही पवारांनी लक्ष वेधले.

शेतकरी अडचणीत आला त्यावेळी अापल्या सरकारने वेळेत मदत दिली गेली. मात्र आम्ही केलं ते पुरेसं नाही म्हणणारे आता सत्तेत अाले आहेत, त्यांनी तरी ते पुरं करून दाखवावं. ग्राहकांना धान्य महाग पडतेय आणि शेतक-यांच्या पदरातही पैसे पडत नाहीत. मात्र मध्यस्थच आपले सहकारी असल्याप्रमाणे सध्याचे सरकार वागत असल्याचा आरोप पवारांनी केला.या वेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, ए.वाय. पाटील, निवेदिता माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे वाचा... दाऊदबाबत जेठमलानी यांचा प्रस्ताव अयोग्य