Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» No Dolby In Ganesh Festival

डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल...

दिव्य मराठी वेब टीम | Aug 28, 2017, 19:29 PM IST

  • डॉल्बी लावणाऱ्या मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई; चंद्रकांत पाटील यांचा इशारा
कोल्हापूर– गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावणाऱ्या गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. या कायद्यांतर्गत दोषींना 5 वर्ष सक्तमजुरीची शिक्षेची तरतूद असल्याचे सांगून गणेशोत्सवात महिलांचा, मुलांचा सहभाग असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ऐतिहासिक मिरवणूक काढून कोल्हापूरचा महाराष्ट्रात नावलौकिक करू, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले. ते काही राजकीय पक्षांच्या प्रमुख नेते मंडळीच्या आणि गणेश मंडळांच्या अध्यक्षांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. या बरोबरच डॉल्बी व्यावसायिकांनी सुद्धा आपली सिस्टीम तात्काळ पोलिसांकडे जमा करावी अन्यथा आम्ही आपले डॉल्बी माझ्या घरी सुरक्षित ठेवेल कोणास देणार नाही, अशा आशयाचे पत्र पोलिसांना द्यावे. तसे न झाल्यास घरी जाऊन पोलिस डॉल्बी सिस्टीम जप्त करतील. त्यांनी ते न्यायालयात जाऊन सोडवून घ्यावेत असे सांगत यंदाच्या गणेशोत्सवात त्यांचे नुकसान झाले तरी त्यांना पुढे निश्चित सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या कायद्याचा अभ्यास करून या व्यावसायिकांसाठी 144 कलम लागू करावे, असा आदेश दिला.

Next Article

Recommended