आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पोलिसांच्या पावती घोटाळ्यानंतर कोल्हापुरात क्रेन बंद, वाहनधारकांना दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - शहरात गेल्या 10 दिवसांपासून वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक शाखेच्या क्रेन गाड्या बंद आहेत. त्यामुळे, वाहतूकधारकांनी दिलासा व्यक्त केला आहे. कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांच्या बनावट पावत्यांचे प्रकरण नुकतेच DivyaMarathi.com ने उघडकीस आणले. तेव्हापासूनच शहरात गाड्या उचलणाऱ्या वाहतूक शाखेच्या क्रेन बंद आहेत. 
 

- दररोज अरेरावी करत सर्वसामान्य वाहनधारकांना विनाकारण क्रेनने वाहने उचलून त्रास देणाऱ्या वाहतूक पोलिसांचा त्रास गेल्या आठ दहा दिवसांपासून कमी झाला आहे. 
- या क्रेन बंद अवस्थेत जुन्या शहर वाहतूक नियंत्रण पोलिस शाखेच्या कार्यालयासमोर  उभ्या आहेत. इतकेच नव्हे, तर कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुद्धा विना अडथळा सुरू आहे. 
- 10 दिवसांपूर्वी दिव्यमराठी ऑनलाईनने कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांच्या बनावट फाईन आणि क्रेनच्या पावत्यांचा घोळ उघडकीस आणला. त्या दोषींवर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई तर, दूर त्यांच्या विरोधात कोणती चौकशी सुरू आहे हे सुद्धा अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
बातम्या आणखी आहेत...