आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत टोलवसुली बंदच; सरकारचा ‘दहावा’ घालणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - आंदोलनाच्या धसक्याने सांगलीतील टोल वसुली बंद असली तरी याबाबतचा अधिकृत निर्णय अजूनही शासनाने घेतलेला नाही. मुदत संपल्यानंतरही होणार्‍या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी येथील कृती समितीने गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. आता मंगळवारी कार्यकर्ते शासन, टोल ठेकेदाराचा ‘दहावा’ घालणार आहे. दरम्यान, सांगलीतील टोलबाबत निर्णय घेण्यासाठी मंगळवारी मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक होणार आहे. मुदत संपलेल्या टोलची वसुली थांबवावी, या मागणीसाठी सांगलीत 18 जानेवारीपासून टोलविरोधी कृती समितीने लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. मात्र शासनाने अद्याप टोल रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. कायमस्वरूपी टोल बंद करण्यासाठी कृती समितीला न्यायालयात जावे लागेल, असे शासनाचे म्हणणे आहे; मात्र टोल बंद करणे शासनाच्याच हातात असल्याने शासनाने टोल रद्द करावा, यावर कृती समिती ठाम आहे. उद्या सरकार व ठेकेदाराचे दहावे घालून दोन दिवसांत टोल रद्दचा शासनाने निर्णय घेतला नाही, तर नाके उद्ध्वस्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.