आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणाशीही युती नाही - मनसेप्रमुख राज ठाकरे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- कुणाशीही युती नाही. जे करायचं ते स्वबळावर. त्यासाठीच, संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्यासाठीच मी बाहेर पडलो आहे, अशा स्पष्ट शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीत मनसेच्या समावेशावर होणा-या चर्चेला मंगळवारी पूर्णविराम दिला. रेकॉर्डब्रेक गर्दीच्या सभेत आपली भूमिका स्पष्ट करतानाच राज यांनी प. महाराष्ट्रातील नेत्यांचे वाभाडे काढले.

राज्याच्या दौ-यावर असलेल्या राज यांची पहिली सभा शहरातील गांधी मैदानावर झाली. माझ्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडते हा अपप्रचार असून त्याला बळी पडू नका, असे सांगतानाच आपल्यावर 89 केसेस आहेत. परंतु महाराष्ट्राच्या हिताचं, मराठी माणसांच्या हितासाठी मी बोलतच राहणार, असेही ते म्हणाले. टोलनाक्यांच्या आंदोलनावर ते म्हणाले की, आम्ही टोलचं आंदोलन केल्यानंतर 65 टोल बंद करण्याची कोणाशीही युती नाही!

घोषणा छगन भुजबळ यांना करावी लागली. मग हे टोल सुरू का ठेवले गेले. तर यांचा इलेक्शन फंड गोळा करण्याचेच काम टोलच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
नेत्यांची खिल्ली : अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांची राज यांनी नक्कल केली. पंतप्रधान मनमोहनसिंग यांची कोटाच्या खिशात हात घालून चालण्याची नक्कल करताना यांना पाठीमागून चावी दिल्यासारखे हे चालतात, तर राहूल गांधी टेम्पो धूत असल्याचे हात हलवत असतात असे ते म्हणाले.

चौकट.....
तर हात कलम करा
सांगली जिल्ह्यातील राजू पासवान या बिहारीने एका नऊ वर्र्र्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. आणि बिहारींवर होणा-या अन्यायामुळे आपण हे कृत्य केल्याचे तो सांगतोय. यापुढे कोणीही आई बहिणींवर हात टाकत असेल तर कुठल्याही आदेशाची वाट न पाहता हात तिथेच कलम करा, असे राज यांनी सांगितले.

नांदेडला 2000 कोटी, महालक्ष्मीला 1000 कोटी द्या
एक शीख पंतप्रधान झाल्यानंतर नांदेडला 2000 कोटी रूपये मिळत असतील तर मग आमच्या महालक्ष्मी मंदिरालाही 1000 कोटी रूपये द्या अशी मागणी ठाकरे यांनी केली.
80 टक्के महिला अशक्त
महाराष्ट्रातल्या 80 टक्के महीला अशक्त आहेत. त्यामुळे पुढच्या पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सत्ताधा-याना त्याची काळजी नाही. पाच आणि दहा हजार रुपये खर्च करून मते विकत घेतली जातात. आणि निवडून आल्यावर जनतेचा पैसा ओरबाडतात. आम्हाला संधी द्या ही परिस्थिती बदलून दाखवू, असा दावा राज यांनी केला.

तर आबांच्या घरच्यांनाही धमक्या जातील
पश्चिम महाराष्ट्रात आता मनसेच्या शाखा सुरू होत आहेत. सांगली जिल्ह्यात गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे कार्यकर्ते आमच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या घरच्यांना धमक्या देत आहेत. यापुढे असे प्रकार घडले तर आर. आर. तुमच्याही घरच्यांना माझ्याकडून धमक्या जातील, असा सज्जड इशाराही राज यांनी दिला.

स्मारकांचा मुद्दा
सध्या विकासाचे राजकारण सोडून महापुरुषांच्या स्मारकाचे राजकारण सुरू आहे . स्मारकांचा मुद्दा काढला की जनता भावनिक होते आणि सरकार समाधानी होते. अरबी समुद्रात स्टॅच्यू ऑ फ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा उभारायचा, तर पाच ते सहा हजार कोटी लागतील. खरेखुरे स्मारक असलेल्या गड, किल्यांची दुरुस्ती करा, असा सल्ला राज यांनी दिला.