कोल्हापूर - ‘आम्हाला सत्तेची अजिबात घाई नाही. त्यामुळे दोन दिवसांत चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल,’ असे सांगत शिवसेनेचे पतक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजप सरकारच्या पाठिंब्याबाबत भूमिका स्पष्ट केली. ‘शिवसेना व दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राज्य टोलमुक्त करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्याची सुरुवात कोल्हापूरपासून करण्याबाबत
आपण सरकारकडे आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला ठाकरे यांनी साकडे घातले होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी ६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ठाकरे रविवारी सपत्नीक अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. विमानतळावर आमदार आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारून ठाकरे थेट मंदिरात आले. त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले व लगेचच ते पुन्हा विमानतळाकडे रवाना झाले. जोपर्यंत सीमाप्रश्न न्यायालयातून सुटत नाही तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मागणीचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. या वेळी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित होते.
पुढे पाहा... ‘राज’कन्येच्या चौकशीसाठी उद्धव रुग्णालयात