कोल्हापूर - ‘आता ऊस दरासाठी दरवर्षी डोकी फोडून घ्यावी लागणार नाहीत,’ अशा शब्दात नूतन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी
आपली भूमिका स्पष्ट केली. कॅबिनेट पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच पाटील यांचे कोल्हापुरात आगमन झाले. या वेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मिरवणूक सुरू होती.
‘राज्य टोलमुक्त करण्याचे आम्ही आश्वासन दिले आहे. त्यासाठी भाजप शासन प्रयत्नशील आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून लवकरच सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्राच्या सुधारणेसाठी अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. मात्र या आधीच्या सरकारने यामध्ये फारसे निर्णय घेतले नव्हते. मात्र आता ते घेतले जातील,’ असेही पाटील यांनी सांगितले.