आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Stopping Toll In Kolhapur, Said Chief Minister

कोल्हापूरातील टोल रद्द होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ठणकावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - मुंबईतील ईस्टर्न फ्री वे चे काम अतिशय चांगले झाले आहे. नागरिकांची चांगली सोय झाली आहे. त्याला आता कुणाचे नाव द्यायचे यावरून वाद नको अशी भूमिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. तसेच कोल्हापूरातील प्रस्तावित टोल रद्द होणार नसल्याचेही त्यांनी पुन्हा ठणकावून सांगितले.


सांगलीत जाण्यापूर्वी चव्हाण यांनी कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शासनाकडे पुरेसा पैसा नसताना बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावरच विकास कामे करण्याची गरज आहे. असे असताना टोल रद्द करता येणार नाही. कोल्हापूरातील टोलविरोधी कृती समितीच्या आक्षेपानंतर समिती नेमण्यात आली होती. काही त्रुटीही दूर करण्यात आल्या. अजूनही त्रुटी असतील तर त्याही दूर केल्या जातील. परंतु टोल रद्द करता येणार नाही असे ते म्हणाले.


एलबीटीवर सर्वमान्य तोडगा
सभेपुर्वी सांगलीतील व्यापा-यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून एलबीटी रद्द करण्याची मागणी केली. यावर चव्हाण यांनी ‘फॅम’चे वकिल अ‍ॅड. बापट यांच्याशी चर्चा करून व्यापारयांना जाचक ठरतील अशा तरतुदी वगळून एलबीटी लागू केला जाईल’, असे आश्वासन दिले.