आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे हत्येप्रकरणी मुश्रीफांचे हात वर; आरोपांनंतर वरिष्ठांकडून समज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- सनसनाटीविधाने करण्याची ‘ख्याती’ असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांना गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांबाबत बोलताना संयम बाळगण्याच्या सूचना वरिष्ठांनी केल्या आहेत. खुद्द मुश्रीफ यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात मुश्रीफ यांनी ‘हल्लेखोर शासनाला सापडलेत, परंतु त्यांची नावे जाहीर केली जात नाहीत,’ असा आरोप केला होता. मात्र, याबाबत विशेष तपास पथकाने चौकशी केल्यानंतर मात्र त्यांनी हात वर केले आहेत.

‘फडणवीस सरकारला हल्लेखोर माहिती आहेत, मात्र ही माहिती लपवली जात अाहे. याबाबत आपण दोनच दिवसांत विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार अाहाेत,’ असा गाैप्यस्फाेट मुश्रीफ यांनी काॅ. पानसरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी केला हाेता. त्यांचे हे प्रकरण पानसरेंना मानणाऱ्या वर्गानेही गांभीर्याने घेतले हाेते. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. मात्र, संबंधित तपास यंत्रणांनी मुश्रीफांकडे याबाबत चाैकशी केली असता, त्यांनी याबाबत आपल्यालाकडे विशिष्ट काही माहिती नसल्याचे सांगत मुश्रीफ यांनी हात वर केल्याचे दिसून अाले अाहे. त्यांच्या या भूमिकेमुळे डाव्या चळवळीच्या लोकांमध्येही मुश्रीफांविषयी तीव्र नाराजी पसरली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही मुश्रीफ यांना ‘ठोस माहिती नसेल तर बाेलण्यावर संयम ठेवा,’ अशा सूचना दिल्या अाहेत. त्यामुळे मुश्रीफांनी अाता अाता सावध पवित्रा घेत याविषयी‘नो कॉमेंट्स’ अशी प्रतिक्रया देण्याची भूमिका घेतली आहे.

...तर मुश्रीफांना २५ लाख रुपये मिळतील
‘जरमुश्रीफ म्हणतात त्याप्रमाणे मारेकऱ्यांची नावे त्यांना माहिती असतील, तर पोलिसांनी जाहीर केलेले २५ लाख रुपयांचे पारितोषिक त्यांना मिळू शकेल,’ असे पानसरे हत्येप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख संजयकुमार यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, शिवसेनेने मुश्रीफ यांच्या विधानाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...