आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता काकू-पुतण्याचे राजकारण बघावे लागणार - अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या काकूच आंदोलनात उतरल्याने महाराष्ट्राला आता काकू-पुतण्याचे राजकारण बघावे लागणार, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी इस्लामपूर येथे बोलताना केली. टोलबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेले आश्वासन न पाळल्यानेच शोभाताई फडणवीस यांच्यावर ही वेळ आल्याचेही ते म्हणाले. पवार म्हणाले, ‘शरद पवार यांनी कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात साखर कारखानदारांना ६६०० कोटी रुपयांची मदत केली.
साखर निर्यातीला अनुदान दिले. कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढला. आज वस्त्रोद्योगाची अवस्था बिकट आहे. वीज बिलात २० टक्के वाढ केली आहे.’ आम्ही टीका केली की हे म्हणतात, ‘आम्ही तिजोरीत काहीच ठेवलं नाही,’ जनतेचा पैसा तिजोरीत ठेवण्यासाठी नसतोच. तो दुष्काळग्रस्तांना, गारपीटग्रस्तांना मदत करण्यासाठी, विकासकामांवर खर्च करण्यासाठी
असतो, हे त्यांना कोण सांगणार? टोल व एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन भाजपने निवडणुकीत दिले होते. त्यावर हे सरकार बोलायला तयार नाही.’’

सरकारने धार्मिक तेढ वाढवली: ‘सध्या कोण काय बोलेल याचा नेम नाही. कोणी म्हणतो, चार-चार मुलं जन्माला घाला, कोणी म्हणतो, भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा द्या, तर कोणी सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिलेल्या चित्रपटावर वादंग निर्माण करत असल्याचे ते म्हणाले.