आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now State Bans On Cigarette? Home State Minister Siganal

सिगारेटवरही राज्यात बंदी?, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - गुटखा व माव्यावरील बंदीचे चांगले परिणाम दिसण्यास चार-पाच वर्षे लागतील. तरुण पिढी वाचवण्यासाठी हा क्रांतिकारी निर्णय घेतला असून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला तर राज्यात सिगारेटवरही बंदी आणली जाईल, असे संकेत अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिले. पानपट्टीधारकांच्या मेळाव्यात येथे पाटील बोलत होते.


पुढे ते म्हणाले की, सकाळी उठून एखादा निर्णय घेतला आणि जाहीर केला असे होत नाही. त्यामागे अभ्यास असतो. मावा व तत्सम पदार्थांमुळे पिढी बरबाद होण्याची भीती व्यक्त होत होती. सुगंधित मिश्रणाच्या नमुन्यांमध्ये नायट्रोझेपम ही गोळी, तर सुपारीत अरॅकुलिन हानिकारक घटक घातला असल्याचे निष्पन्न झाले. कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहूनच हा निर्णय घेतला आहे.