आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 24 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 24 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर,जिल्हा प्रमुख संजय पवार,विजय देवणे, आणि मुरलीधर जाधव यांच्या सोबत शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते. अरूण दुधवडकर म्हणाले की, 24 तारखेला सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरे हे शिनोळी येथील शेतकऱ्यांच्या ऊस, काजू, भात आणि बटाटा पिकांबाबत  असलेल्या समस्यांबाबत संवाद साधतील, तसेच शिनोळी ग्रामपंचायत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण करतील, त्यानंतर ते सकाळी 11 ते 12 यावेळेत नेसरी (ता.गडहिंग्लज) या ठिकाणी जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता हुपरी (ता.हातकणंगले) येथे जाहीर सभेनंतर GST मुळे चांदी व्यापारी, हातमाग व्यापारी यांच्यावर झालेल्या विपरीत परिणामांबाबत संवाद साधतील, सायंकाळी 4 वाजता उंचगाव (ता.करवीर) या ठिकाणी कामगारांशी संवाद साधणार आहेत.

 

सायंकाळी 6 वाजता कुडीत्रे येथील कुंभी कासारी सह.साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जाहीर सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता शनिवार पेठेतील आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी E-रिक्षा वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते येथील खासगी हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहेत.

 

25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता कोल्हापूर शहरातील व्यापारी, उद्योजक, कारखानदार, छोटे व्यापारी यांच्याशी सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.त्यानंतर 10.30 वाजता शिरोळकडे प्रयाण करून सकाळी 11 वाजता जांभळी गावी ऊस, भाजीपाला शेतकरी आणि क्षारपड जमीन धारक शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.तेथून 12 वाजता शिरोळ बसस्थानक उदघाटन आणि त्यानंतर 12.15 ते 12.13 पर्यंत नृसिंहवाडी येथे दत्त मंदिरात देवदर्शनासाठी जाऊन दुपारी 1 वाजता कुरुंदवाडच्या एसपी हायस्कूल मैदानावर आयोजित जाहिर सभेला ते संबोधित करतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता जयसिंगपुरकडे प्रयाण करून 3 वाजून 15 मिनिटांनी जयसिंगपुरच्या व्यापाऱ्यांशी संवाद साधून पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यानंतर तेथून उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्याकडे प्रयाण करणार असल्याचे यावेळी अरुण दुधवडकर यांनी सांगितले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...