आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडोबाच्या यात्रेत वृद्धेचा मृत्यू,चेंगराचेंगरीत पंधरा जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - सातारा जिल्ह्यातील पाल खंडोबाच्या यात्रेत देवस्थानचा हत्ती उधळल्याने झालेल्या चेंगराचेगरीत एका वृद्धेचा मृत्यू, तर पंधरा जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. अंजनाबाई नामदेव कांबळे (६५, रा. कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक सीमेवरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबाचे पाल येथे लाखो भाविक येतात. यात्रेची सुरुवात हत्तीवरून मिरवणुकीने होते. देवस्थानचा हत्ती त्यासाठी वापरला जातो. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास मिरवणूक तारळी नदीवर आली. हत्तीच्या पाया पडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. त्याच वेळी मिरवणुकीत हळद तसेच बारीक लोकरीचा भंडारा उधळला गेला. त्याचे कण डोळ्यात गेल्याने हत्ती बिथरला. याच वेळी त्याच्या पायाखाली आलेल्या अंजनाबाई यांचा मृत्यू झाला. हत्ती उधळल्याने झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी झाली. यात पंधरा भाविक जखमी झाले. माहुतांनी हत्तीला शांत केल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू झाली.