आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार लक्ष्मण मानेंना आणखी एका गुन्ह्यात अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- माजी आमदार लक्ष्मण माने यांना मंगळवारी बलात्काराच्या दुस-या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील शारदाबाई पवार आश्रमशाळेतील महिला कर्मचा-यांना नोकरीत कायम करण्याचे आमिष दाखवून मानेंनी लैंगिक अत्याचार केल्याची सात महिलांनी तक्रार दिली आहे, त्यावरून मानेंवर सात गुन्हे दाखल झाले आहेत.

एका गुन्ह्यात त्यांना नुकतीच न्यायालयीन कोठडी मिळाली असता पोलिसांनी मानेंना दुस-या गुन्ह्यात अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. माने यास मदत करणारी मनीषा गुरव हिच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.