आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Again Make Ashok Chavan As Chief Minister, Ram Naik Advise To Congress

अशोक चव्हाण यांना पुन्हा मुख्‍यमंत्री करा, राम नाईक यांचा कॉंग्रेसला सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - आदर्श घोटाळाप्रकरणी चार मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट देणा-या काँग्रेसने अशोक चव्हाण यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, असा उपरोधिक सल्ला माजी केंद्रीय पेट्रोलियममंत्री राम नाईक यांनी दिला. सांगलीत गुरुवारी ते पत्रकारांशी बोलत होते. एका खासगी कार्यक्रमानिमित्त नाईक सांगलीत आले होते.
चार मुख्यमंत्री, दोन मंत्री, 12 अधिकारी आणि धनदांडग्यांना दोषी ठरवणारा न्यायालयीन चौकशी अहवाल फेटाळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पारदर्शी कारभाराला तिलांजली दिल्याचे ते यावेळी म्हणाले. म्हणजे हा अहवाल मंत्रिमंडळाने फेटाळून 15 दिवस उलटल्यानंतरही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. म्हणजेच हा निर्णय मान्य आहे, असाच अर्थ होतो. त्यामुळे त्यांनी आदर्शप्रकरणी घरी गेलेले अशोक चव्हाण यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा केंद्रात पंतप्रधान कार्यालयात मंत्री म्हणून बोलवावे,’’ असा टोला लगावला.
यूपीए सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या उत्पादनासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, त्यामुळे देशाला महागाईचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोपही या वेळी नाईक यांनी केला.
मनसे महायुतीत नाही
राज्यात भाजपची शिवसेना आणि रिपाइंची महायुती आहे. जागा वाटपाचा निर्णय तिन्ही पक्षांच्या एकत्र विचारातून घेतला जाईल, असे सांगताना राम नाईक यांनी महायुतीत मनसे नसेल, असेही स्पष्ट केले..