आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघबीळ घाटात चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, 2 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वाघबीळ घाटातील 50 ते 60 फूट खोल दरीत मध्यरात्रीच्या सुमारास आलिशान मोटार कोसळल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले. 
 
उमेश सुभाष कनटगे (रा. कागवाड, ता.अथणी, जि. बेळगाव) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी कोडोली पोलिस तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी  मदतकार्यास सुरवात केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.प्रतिम जयपाल हजारे (वय 34, रा. विजयनगर, सांगली) आणि ओंकार अशोक पवार (रा. खणबाग, सांगली) अशी जखमींची नावे आहेत. 

या अपघाताची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास प्रितम हजारे हे आपल्या आलिशान मोटारीतून (एमएच-10-बीएम-0079) कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरून जात होते. त्यांच्या सोबत मोटारीत ओंकार पवार आणि उमेश कनटगे हे दोघे होते. वाघबीळ घाटातून जात असताना हजारे यांचा मोटारीवरील ताबा सुटला. त्यामुळे मोटार सुमारे 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. त्यात उमेश कनटगे हे जागीच ठार झाले. तर हजारे व पवार हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती पहाटेच्या सुमारास कोडोली पोलिस ठाण्यात  समजली. घटनास्थळी तात्काळ  पोलिसांनी धाव घेऊन पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मदत कार्यास सुरवात केली. जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. आज दुपारपर्यंत मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
बातम्या आणखी आहेत...