आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर : इचलकरंजीतील महिलेचे स्वाईन फ्लूच्या आजाराने निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - इचलकरंजी येथील मधुबन हौसिंग सोसायटीतील सुरेखा गजरे (वय ४५) या महिलेचे स्वाईन फ्लूच्या आजाराने निधन झाले.
 
त्यांच्यावर कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती खालावल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच या महिलेचे  निधन झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

याबाबत अधिक माहिती अशी, सुरेखा गजरे यांना घशाचा आजार झाल्याने इचलकरंजी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याने त्यांना तातडीने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात  आले. या रुग्णालयात गेल्या 8 दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र त्यांची प्रकृती मंगळवारी अत्यवस्थ झाली. त्यामुळे या महिलेला ताबडतोब छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरु करण्यापूर्वी तपासले असता त्यांचे निधन झाल्याचे लक्षात आले. 
बातम्या आणखी आहेत...