आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One More Sexul Assult Complaint Against Uparakar Laxman Mane

\'उपरा\'कार लक्ष्‍मण मानेंविरोधात लैंगिक छळाची आणखी एक तक्रार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - बदलीची भीती दाखवून महिला कर्मचा-यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेले ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्याविरोधात बुधवारी लैंगिक छळाची आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.या प्रकरणात आत्तापर्यंत मानेंविरोधात चार तक्रारी पोलिसात नोंद झाल्या आहेत. दरम्यान, बुधवारी सायंकाळपर्यंत मानेंचा शोध पोलिसांना लागला नव्हता.

सातारा येथे मानेंच्या शिक्षण संस्थेत कार्यरत असणा-या एका महिलेने दोन दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. 2003 पासून दबाव आणत मानेंनी आपल्यावर अत्याचार केल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे. याच दिवशी पुणे व सातारा येथील आणखी दोन महिलांनी मानेंविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापाठोपाठ बुधवारीही एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केली.

बलात्काराचा गुन्हा दाखल झालेले माने फरार असून पोलिसांनी मुंबई, पुणे येथे जाऊन त्यांचा शोध घेतला, मात्र अद्याप ते हाती लागलेले नाहीत. दरम्यान, मानेंवर दाखल झालेल्या तक्रारी खोट्या असून तक्रारकर्त्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी रिपार्इंसह अन्य काही संघटनांनी केली आहे. या महिलांनी त्याच्यावर झालेले अत्याचार सिध्द केले तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन देतानाच त्यांनी दहा वर्षे तोंड का उघडले नाही? असा प्रश्नही रिपाइंने उपस्थित केला आहे.