आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे प्रकरणी अाणखी एक संशयित ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - काॅ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने आणखी एक संशयितास काेल्हापुरातून ताब्यात घेतल्याची चर्चा अाहे. दरम्यान, या खटल्याची चार अाॅगस्ट राेजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी हाेणार असून त्यावेळी याबाबत काही माहिती उघड होण्याची शक्यता आहे.

गेल्याच आठवड्यात तपास पथकाचे प्रमुख संजयकुमार यांनी कोल्हापुरात पानसरे परिवाराची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आणखी काही लोक माहिती देण्यासाठी पुढे येत असल्याचे सांगितले होते. याच माहितीवरून कोल्हापुरात आणखी एका संशयितास ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असल्याने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत दुजोरा दिला नाही. मात्र या तपासात मोठी प्रगती झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. गुरूवारी न्यायालयात याबाबत अधिक काही गोष्टी स्पष्ट होवू शकतात असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. कारण तपासातील प्रगतीबाबतचा अहवाल न्यायालयात दिला जाणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...