आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One More Threat Letter To Kolhapur Bases Writer, Journalist

...तर तुमचाही पानसरे-दाभोळकर करू- सुभाष देसाईंना अज्ञातांची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. सुभाष देसाई - Divya Marathi
डॉ. सुभाष देसाई
कोल्हापूर- कोल्हापूरातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुभाष देसाई यांना सोमवारी एका निनावी पत्राद्वारे गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करु नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा, अशा आशयाचा मजकूर लिहित देसाईंना धमकी देण्यात आली आहे.
कोल्हापूरातील देवी महालक्ष्मीबाबत एक लेख लिहल्यामुळे देसाईंना ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर देसाई यांनी जुना राजवाडा पोलिसांत धमकी दिली आहे. कोल्हापूरचे एसपी प्रदीप देशपांडे यांनी या घटनेची दखल घेतली चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून देसाई यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला आहे.
याबाबतची माहिती अशी की, डॉ. सुभाष देसाई यांनी कोल्हापूरातील प्रसिद्ध देवी महालक्ष्मीबाबत नुकताच एक लेख लिहला आहे. या लेखात महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती विष्णूपत्नी नसून, शिवपत्नी आहे असे म्हटले आहे. मात्र, हा लेख प्रकाशित झाल्यानंतर सोमवारी दुपारी देसाईंना एक निनावी पत्र आले.
या पत्रात म्हटले आहे की, ''महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे. विष्णूपत्नी नाही, असे तुमचे म्हणणे आहे, ते तुमच्या पुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल पण असले प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला हे सांगायला नको. साळोखेनगरातील घरात तुम्ही एकटेच राहता, त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते. ऑफिसमध्येही जरा सांभाळून राहा, कारण आजूबाजूचे लोकही मदत करतील असे वाटत नाही. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करु नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाईचे नशिब साथ देईलच असे नाही, असे पत्रात नमूद करीत धमकी दिली आहे. तसेच शेवटी तुमचा 'एक हितचिंतक' असेही म्हटले आहे.
या प्रकारानंतर देसाई यांनी पोलिस ठाणे गाठले. एसपी प्रदीप देशमुख यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांना पत्राच्या अधारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
पुढे वाचा, डॉ. सुभाष देसाई यांना आलेली धमकी सरकारने गांभीर्याने घ्यावी - नवाब मलिक