आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज यात्रेसाठी अर्ज भरण्यास 15 नोव्हेंबरपासून सुरुवात; प्रक्रिया 7 डिसेंबर अखेर सुरु राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- हज यात्रा 2018 साठी कोल्हापूर जिल्ह्यातून जाऊ इच्छिणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी 15 नोव्हेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास कब्रस्तान मस्जिद (मर्कज),बागल चौक येथे सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया 7 डिसेंबर अखेर सुरु राहणार आहे, अशी माहिती कब्रस्तान मस्जिद (मर्कज), बागल चौकच्या व्यवस्थापनाकडून कळवण्यात आले आहे.
 
हज यात्रा 2018 साठी जाऊ इच्छिणाऱ्या हज यात्रेकरूंच्या सुविधेसाठी कब्रस्तान मस्जिद (मर्कज), बागलचौकच्या जबाबदार सदस्यांच्या झालेल्या चर्चेनुसार यावर्षी कब्रस्तान मस्जिद येथेच हज यात्रेचे अर्ज ऑनलाईन भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याची नोंद घेवून इच्छुक स्री–पुरुष हज यात्रेकरूंनी आपल्या पासपोर्ट आणि अन्य महत्वाच्या कागदपत्रांसह दि. 15 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कब्रस्तान  मस्जिद (मर्कज) येथे जावून आपले अर्ज भरावेत तसेच कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी हाजी इम्तियाज बारगीर – 9860848457 व हाजी इक्बाल देसाई – 9921166161 या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...