आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organic Farming Policy Very Soon Declare Fadnavis

सेंद्रिय शेती धोरण लवकरच जाहीर करणार - फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ‘एकीकडे भारतातील देशी गाई परदेशी स्वीकारल्या जातात, मात्र आपल्याकडे याच्या उलट परिस्थिती आहे. म्हणूनच केंद्र शासनाने याबाबत जो प्रकल्प आखला आहे त्याची अंमलबजावणी राज्यात करतानाच आर्थिक हिस्साही उचलू. तसेच राज्याचे सेंद्रिय शेती धोरण लवकरच जाहीर केल जाईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. कोल्हापूरपासून जवळच असलेल्या कणेरी मठावरील चौथ्या भारतीय संस्कृती महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते.

‘एक एकर शेतीमध्ये लखपती व्हा, अशा पद्धतीने या मठावर शेतीतील अनेक प्रयोग साकारण्यात आले आहेत. अशा प्रयोगासाठी राजमान्यता देतानाच प्रशिक्षणासाठी आता शेतकरी आणि आमच्या अधिका-यांना या मठावर पाठवावे लागेल,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी मठाच्या कार्याचे कौतुक केले. भारतीय संस्कृती ही विज्ञाननिष्ठ आहे. जेव्हा वैज्ञानिक दृष्टी न ठेवता कर्मकांडाच्या मागे लागलो तेव्हा समाज रसातळाला गेल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच अशा पद्धतीने काम करणा-यांच्या सूचनांचा शासन गांभीर्याने विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, जुनागडचे मुक्तानंद बापूजी, झाबुआचे महेश शर्मा, पोपट पवार, विजयपूरचे सिद्धेश्वर महास्वामी, गोविंदाचार्य , बसवराज पाटील, खासदार धनंजय महाडिक व विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

पुढे वाचा गाईचे महत्त्व...