आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात चीन-पाकिस्तानी राष्ट्रध्वजाची होळी; चिनी ड्रॅगन,चायना वस्तुंचीही तोडफोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- वारंवार भारतविरोधी भूमिका घेणार्‍या चीनला धडा शिकवण्यासाठी सरकारने अधिकृतपणे चिनी वस्तूंचा वापर न करण्याविषयी जाहीर भूमिका घ्यावी. शहरातील सर्व व्यापार्‍यांनी ‘मेड इन चायना’च्या वस्तू  खरेदी आणि विक्री करू नये, असे आवाहन समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

पतीत पावन संघटनेच्या नेतृत्त्वाखाली चीन आणि पाकिस्तान या देशांच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांनी मंगळवारी दुपारी 12.30 वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने केली.या वेळी हिंदुत्ववाद्यानी चीन, पाकिस्तान ध्वज आणि चिनी ड्रॅगन अन् वस्तूंच्या फलकाला चपलाचे फटके मारून त्याची होळी केली.

अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवाद्यांनी 10 जुलैला हल्ला केला. यात 8 यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या घटनेचा हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध केला. या वेळी चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष सतीश निकम, बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख संभाजी साळुंखे, शहरप्रमुख महेश उरसाल, शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शिवसेनेचे उदय भोसले, किशोर घाडगे, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, सुधाकर सुतार, हिंदू एकता आंदोलनाचे  शिवाजीराव ससे, हिंदुत्ववादी सर्व गोविंद देशपांडे, सुदर्शन भोसले, स्वरूप पाटील, निवास पाटील, सर्वेश पाटील, सूरज निकम, गणेश पाटील आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...