आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीत आजपासून नित्योपचार बंद, २४ तास दर्शनाची सोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्री विठुरायाचे दर्शन घडावे यासाठी शनिवारपासून श्री विठ्ठलाचे सर्व नित्योपचार सुमारे पंधरा दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे शनिवारपासून २४ तास दर्शन सुरू राहणार अाहेत, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी दिली. आषाढी यात्रा अगदीच तोंडावर आलेली आहे. येत्या २७ जुलै रोजी आषाढी एकादशीचा अनुपम्य असा सोहळा संपन्न होत आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद््गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांंना सोलापूर जिल्ह्यातील प्रवेशाचे आता वेध लागलेले आहेत. यात्रेच्या काळात गर्दीमुळे श्री विठुरायाचे मनासारखे दर्शन घडत नाही, यासाठी पालखी सोहळ्यातील भाविक पालखीतून पुढे पंढरपुरात येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन करून परत दिंड्यांमध्ये सामील होत असतात. त्यामुळे यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्री विठुरायाचे दर्शन घेणे आता सोयीस्कर होणार आहे. या काळात देवाचे नवरात्र देखील असते. यासाठी शनिवारी दुपारी ११ वाजता श्री विठ्ठलाची विधिवत पूजा करून देवाचा पलंग काढण्यात येणार आहे
.
यात्रेनंतर आॅगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात चांगला दिवस पाहून देवाची प्रक्षाळपूजा करून देवाचे नित्योपचार पुन्हा सुरू करण्यात येणार अाहे, असेही कादबाने यांनी सांगितले. त्यामुळे शनिवारपासून भक्तांना २४ तास दर्शन देण्यासाठी मंदिर समितीची यंत्रणा सज्ज होत आहे.
बातम्या आणखी आहेत...