Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | pandharpur god vitthal on coating start

विठ्ठल मूर्तीवर आजपासून वज्रलेप

महेश भंडारकवठेकर | Update - Mar 18, 2012, 08:48 AM IST

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला लेप देण्याची प्रक्रिया रविवारी रात्री सुरू करण्यात येईल.

 • pandharpur god vitthal on coating start

  पंढरपूर: पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीला लेप देण्याची प्रक्रिया रविवारी रात्री सुरू करण्यात येईल. दोन रात्री हे काम चालणार असल्याने सोमवार व मंगळवार असे दोन दिवस पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. या काळात मुखदर्शन घेता येईल. ही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.
  विठ्ठल मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी मंदिर समितीने लेपप्रक्रिया करण्याचे ठरवले. औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे उपअधीक्षक एम. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीला ‘हॅवॅकर बी एस 290’ हे रसायन वापरून लेप देण्यात येईल. यापूर्वी मूर्तीवर दोन वेळा लेप देण्यात आला होता. त्यामुळे पदस्पर्श दर्शन चालू होते. या वेळी लेप देण्याचे काम दोन रात्रीत होत आहे. त्यामुळे प्रथमच दोन दिवस पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
  मूर्तीची झीज होण्याची कारणे
  विठ्ठलाची ही स्वयंभू वालुकामय मूर्ती आहे. वर्षानुवष्रे दही, दूध, लोणी मध व साखर वापरून तिची महापूजा करण्यात येत होती. दिवसाकाठी सहा ते आठ महापूजा होत. शिवाय मूर्तीच्या पदस्पर्श दर्शनाची परंपरा अजूनही कायम आहे. भाविक मूर्तीच्या चरणावर डोके ठेवून तसेच चरणांना हात लावून मनोभावे दर्शन घेतात. काही भाविक मूर्तीला लिंबू, साखरदेखील लावत. मंदिराच्या गाभार्‍यातील तापमानात होणारा बदल अशा कारणांमुळे मूर्तीची झीज होत असल्याचे पुरातत्त्व विभागाने अहवालात नमूद केले आहे.
  महापूजेवर निर्बंध
  एकापाठोपाठ एक महापूजांवर मध्यंतरी मंदिर समितीकडून निर्बंध घालण्यात आले. भाविकांना एकावेळी गाभार्‍यात बसवून एकत्र महापूजा केली जाऊ लागली. या वेळी मूर्तीवर दही, दुधासारख्या पंचामृत अभिषेकाची पद्धत बंद केली. मूर्तीच्या चरणावर चांदीचे कवच ठेवून अभिषेक करण्याची पद्धत रूढ झाली. सध्या भाविकांच्या हस्ते केली जाणारी महापूजाच बंद करण्यात आली आहे.
Trending