आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री विठ्ठल मुर्तीची लेप प्रक्रिया रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - श्री विठ्ठलमूर्तीला वज्रलेप लावण्याची (इपॉक्सी) प्रक्रिया तूर्त रद्द करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. वारकरी संघटनांच्या विरोधापुढे झुकत देवस्थान समितीने दर्शन बंद करण्याचा निर्णयही मागे घेतला आहे.
विठ्ठलमूर्तीची झीज रोखण्यासाठी रासायनिक लेप लावण्याची शिफारस डॉ. गो. ब. देगलूरकर व विक्रम चिडगुपकर यांच्या समितीने केली होती. त्यानुसार समितीने मंगळवारपासून दर्शन बंद करून मुखदर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात वारकरी संघटनेने मंगळवारी नामदेव पायरीजवळ धरणे आंदोलन केले. त्यामुळे पुरातत्व विभागामार्फत 20 रोजी पाहणी झाल्यानंतर मगच लेप लावण्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले.