Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | pandharpur vitthal statue cote

विठ्ठल मूर्तीवर लेप प्रक्रिया गरजेचीच

प्रतिनिधी | Update - Feb 29, 2012, 02:18 AM IST

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक मंगळवारी भक्त निवास येथे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

  • pandharpur vitthal statue cote

    पंढरपूर - विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक मंगळवारी भक्त निवास येथे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनाबाबत सकारात्मक चर्चा झाली.
    औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी पाहणी करून दिलेल्या अहवालात विठ्ठल मूर्तीच्या मूर्ती संवर्धनासाठी लेप प्रक्रिया गरजेचे असल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसात मंदिर समिती मूर्ती शास्त्राचे अभ्यासक गो. ब. देगलूरकर व आंदोलन करणा-या वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून नक्की लेप कधी द्यायचा याची तारीख निश्चित करण्यात येईल. ही प्रक्रिया याच महिन्यातही पूर्ण होऊ शकेल. लेप प्रकियेसाठी ‘व्याकर बी एस 290’ हे रसायन वापरण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली. श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या चंदन उटी पूजा 23 मार्चपासून सुरू होणार आहेत. दररोज दोन म्हणजचे एकूण 63 पूजा होणार आहेत, त्यासाठी देणगी रक्कम अनुक्रमे 5 व 2.5 हजार अशी घेण्यात येणार आहे. तसेच भाविकांच्या सुविधांसाठी मंदिर समिती प्राधिकरणच्या माध्यमातून 5 कोटी रुपये खर्च करणार आहे. गोव-या विकून चरितार्थ चालवणा-या शिवबाई मल्लिकार्जुन कणके (70) या सोलापूरमधील महिलेने 2 लाख रुपये देणगी अर्पण केली.Trending