Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | pandharpur vitthal statue cote

पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीवर पंधरा दिवसांत होणार इपॉक्सी प्रक्रिया

प्रतिनिधी | Update - Mar 01, 2012, 01:05 AM IST

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील ऐतिहासिक विठ्ठलमूर्तीची झीज थांबवण्यासाठी इपॉक्सी पद्धतीने लेपन करण्याची गरज असल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाच्या समितीने दिल्यानंतर 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • pandharpur vitthal statue cote

    पंढरपूर - श्रीक्षेत्र पंढरपूर येथील ऐतिहासिक विठ्ठलमूर्तीची झीज थांबवण्यासाठी इपॉक्सी पद्धतीने लेपन करण्याची गरज असल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाच्या समितीने दिल्यानंतर 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. झीज रोखण्यासाठी विठ्ठलमूर्तीवर इपॉक्सी लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय यापूर्वीच झाला होता. मात्र वारकरी संप्रदायाने त्याला तीव्र विरोध केल्याने तूर्त या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. पुरातत्त्व विभागाच्या पथकाने मूर्तीची पाहणी करून लेपन प्रक्रिया करणे गरजेचे असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार केंद्रीय पुरातत्त्व विभाग व पुणे येथील डेक्कन संस्थेचे पुरातत्त्व विभागप्रमुख डॉ. गो. बा. देगलूरकर यांच्याशी चर्चा करून 15 दिवसांत लेपन प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी दिली.Trending