Home »Maharashtra »Western Maharashtra »Kolhapur» Panhala Fortshivaji Fort, Kolhapur

PHOTOS: सापांचा किल्ला म्हणून ओळख, 22 किमी लांब आहे हा भुयार...

कोल्हापुरजवळील पन्हाळा गड परिसर हा एक हिल स्टेशन म्हणून लोकांच्या परिचयाचे आहे.

दिव्यमराठी वेब टीम | Oct 03, 2017, 09:49 AM IST

  • पन्हाळा गडावर तब्बल 22 किमी लांबीचे भुयार आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव हे भुयार बंद आहे.
कोल्हापूर- कोल्हापुरजवळील पन्हाळा गड परिसर हा एक हिल स्टेशन म्हणून लोकांच्या परिचयाचे आहे. या शहराचा इतिहास शिवाजी महाराजांशी जोडला आहे. शिवाजी महाराजांचा बराचसा काळ या पन्हाळा गडावर गेल्याचे सांगितले जाते. याला सापांचा किल्लाही म्हटले जाते. या किल्ल्यात 22 किमीचा भुयार आहे. जो किल्ल्यापासून सुरु होतो ते एका देवीच्या मंदिरापर्यंत जाऊन थांबतो.का म्हणतात सापांचा किल्ला?.....
- पन्हाळा किल्ला कोल्हापुर-रत्नागिरी मार्गावर आहे. जो 7 किमी परिसरात परसला आहे.
- या किल्ल्याचा परिसर झिग झॅक आकाराचा आहे त्यामुळे तो सापासारखा दिसतो त्यामुळेच त्याला सापांचा किल्ला म्हटले जाते.
- शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर 500 पेक्षा अधिक दिवस घालवल्याचे सांगितले जाते. पुढे 1827 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
- या किल्ल्याची निर्मिती राजा भोज यांनी केली होती. मात्र बदलत्या सत्ताकाळात या किल्ल्यावर अनेक राजांनी राज्य केले.
- या किल्ल्याजवळच अंबरखाना नावाचा एक छोटा किल्ला आहे. जो त्या काळात अन्नभंडारासाठी वापरला जायचा.
22 किमीचे आहे गुप्त भुयार...
पन्हाळा गडाजवळ जुना राजवाडा येथे कुलदैवता तुळजा भवानीचे मंदिर आहे. जेथे भुयारामार्गे जाता येते. हे अंतर तब्बल 22 किमी इतके आहे. सध्या सुरक्षेच्या कारणास्तव हे भुयार बंद आहे. या भुयारात कधीकाळी महर्षी पराशर राहत असल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर 18 व्या शतकातील महान कवी मोरोपंत यांनी कविता लिहल्या होत्या.
अंधार बावडी...
पन्हाळा किल्ल्यात एक अंधार बावडी नावाची विहिर आहे. जी एका इमारतीखाली गुप्त पद्धतीने बनविली आहे. ही अंधार बावडी विहीर मुगल शासन काळात तयार केली गेली. आदिल शाहच्या आदेशाने तिची निर्मिती केल्याचे बोलले जाते. आदिल शाहचे म्हणणे होते की, किल्ल्यावर जरी शत्रूंनी हल्ला केला किंवा येथील पाण्यात विष खालवले तरी आपल्याला दगफटका होणार नाही. त्यामुळे तीन मजली इमारतीखाली ही अंधार बावडी बनविली गेली.
अनेक राजघराण्यांनी किल्ल्यावर अधिराज्य गाजवले....
हा किल्ला अतियश महत्त्वाचा मानला जायचा. त्यामुळे अनेक राजघराण्यांनी आपापल्या सत्ताकाळात यावर अधिराज्य गाजवले. यादव, बहमनी, आदिलशाही आदींनी अधिराज्य गाजवल्यानंतर 1673 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर आपले मुख्यालय स्थापन केले.
पुढील स्लाईड्सद्वारे पाहा, या किल्ल्याचे फोटोज....

Next Article

Recommended