आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pankaja Munde News In Marathi, BJP, Divya Marathi

सरकारला हद्दपार करण्यासाठीच माझी संघर्ष यात्रा - पंकजा मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा - ‘राज्यात घोटाळ्याचे सरकार आहे. आघाडी सरकारने या घोटाळ्यातून कोट्यवधी रुपये लाटले आहेत. पंधरा वर्षात एकशे सोळा घोटाळे करणाऱ्या या दादा- बाबाच्या सरकारला हद्दपार करण्यासाठीच मी संघर्ष यात्रा काढली आहे. सर्वसामान्य माणसाच्या हाती सत्ता देण्याचे गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी आले आहे,’ असे उद्गार भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा, आमदार पंकजा मुंडे यांनी रविवारी काढले.

पंकजा यांची संघर्ष यात्रा रविवारी पुणे िजल्ह्यातून फलटण (जि. सातारा) येथे आली. ‘रासप’चे नेते महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते व पदािधकारी त्यांच्यासमवेत उपस्थित हाेते. सभेत पंकजा म्हणाल्या की, जिजाऊंचे शाैर्य, अहिल्याबाईंचे आैदार्य आणि सावित्रीबाईंचे धैर्य घेऊन मी आज आपल्यासमाेर आली आहे. माझ्या वडिलांनी वारशात मला दाग-दािगन्यांएेवजी लाेकांची ताकद दिली आहे. आणि त्याच जाेरावर मला सत्तापरिवर्तन घडवून आणायचे आहे,’ असे भावाेद‌्गारही त्यांनी काढले.

महायुतीतील कथित वादाचे खंडन करताना पंकजा म्हणाल्या की, ‘महायुती हे यशाचे सूत्र आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत, विरोधक केवळ आमच्यािवराेधात आरडाआेरडा करतात. परंतु राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे, महिला सुरक्षित नाहीत, हे या सत्ताधाऱ्यांना दिसत नाही. अशा सरकारला विसर्जीत करा,’ असे आवाहनही त्यांनी केले.

आम्ही पंकजांच्या पाठीशी : खोत
सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील गुन्हेगारीविरोधात यात्रा काढली होती. आता त्यांच्या मुलीला भ्रष्ट नेत्यांविरोधात यात्रा काढावी लागली. आम्ही सर्व जण तिच्या पाठीशी आहोत, सर्व जण साथ देणार आहोत.’