आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pansare Murder Case Journalist Nikhil Wagle Was Next Target

पानसरे खून प्रकरण : निखिल वागळे निशाण्‍यावर, पण नाकारले पोलिस संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूर/ मुंबई - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्‍या खून प्रकरणात 'सनातन'चा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याला पोलिसांनी अटक केली. त्‍याच्‍या फोन संभाषणातून महत्‍त्‍वाचे पुरावे मिळाले असून, दाभोळकर-पानसरे यांच्‍या पाठोपाठ महाराष्‍ट्रात आता ज्‍येष्‍ठ पत्रकार निखिल वागळे हे हिंदूत्‍ववाद्यांच्‍या निशाण्‍यावर होते, हे स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
वागळेच का ?
महाराष्‍ट्र 'अनिसं'चे संस्‍थापक नरेंद्र दाभोळकर आणि डाव्‍या विचारसणीचे ज्‍येष्‍ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्‍या हत्‍येनंतर वागळेंनी आपल्‍या टीव्‍ही शोमधून हिंदूत्‍ववाद्यांच्‍या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्‍यामुळे आता यापुढे महाराष्‍ट्रातील तिसरे आणि देशातील चौथे टार्गेट म्‍हणून वागळे यांचे नाव मारेकऱ्यांच्‍या लिस्‍टमध्‍ये होते, याचे महत्‍त्‍वाचे पुरावे गायकवाड याच्‍या फोन संभाषणातून पोलिसांच्‍या हाती लागले आहेत.
वागळेंनी नाकारला पोलिस सुरक्षेचा प्रस्‍ताव
महाराष्‍ट्र पोलिसांनी गायकवाडच्‍या या संभाषणाची गंभीर दखल घेऊन पत्रकार वागळे यांच्‍याकडे सुरक्षा देण्‍याचा प्रस्‍ताव ठेवला. मात्र, वागळेंनी तो नाकारल्‍याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांकडे आता तीन दिवस
गायकवाडच्या पोलिस कोठडीचे चार दिवस संपले असून, तीन दिवसांत पोलिसांना माहिती काढायची आहे. गोव्यात झालेल्या स्फोटात 'सनातन'चे दोघे ठार झाले होते. रूद्र पाटील तेव्हापासून फरार आहे. जत तालुक्यातील रूद्र एनआयएच्या वाँटेडच्या यादीत आहे. समीरच्या अटकेची माहिती मिळाल्याने एनआयएचे पथक आले होते. समीरला ठेवलेल्या पोलिस मुख्यालयात येण्याऐवजी बाहेरच जिल्हा पोलिस प्रमुखांकडून पथकाने माहिती घेतली.

एक लाख सह्यांचे मोदी यांना निवेदन
पानसरे यांच्या हत्येला महिने झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक लाख सह्यांचे निवेदन पाठवण्याची मोहीम रविवारपासून सुरू झाली. पानसरे फिरायला जात त्या मार्गावरून रविवारीही मॉर्निंग वॉक काढण्यात आला.
पुढील स्‍लाइडवर वाचा,
- रुद्र पाटीलला केले मुख्‍य आरोपी घोषित...
- हत्‍येत दहा जणांचा सहभाग
- समीरची सुरक्षा वाढली; जीवित्‍वास धोका
- यांच्‍याही जीवित्‍वास धोका