आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानसरे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी मुलास संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- ज्येष्ठ कामगार नेते कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाला संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे पत्र हिंदू विधिज्ञ परिषदेचे पदाधिकारी अॅड. संजीव पुनाळकर यांनी पाेलिसांना पाठवले हाेते. त्यानुसार, या खटल्यात अतिशय माेलाची भूमिका बजावणाऱ्या या मुलास संरक्षण पुरवण्यात येईल, अशी माहिती काेल्हापूरचे पाेलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिली.

या प्रकरणात अटक करण्यात अालेला संशयित सनातन संघटनेचा साधक समीर गायकवाड याचे अॅड. पुनाळकर हे वकील अाहेत. त्यांनी १२ डिसेंबर रोजी हे पत्र राजारामपुरी पोलिसांना पाठवले हाेते. यामध्ये या खटल्यात प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाचा संदर्भ देण्यात अाला हाेता. ‘या मुलाचा दिनक्रम आम्हाला माहीत आहे. मात्र, या सगळ्यात त्याचे काही बरेवाईट झाले तर त्याचे खापर सनातनवर फोडले जाऊ नये,’ अशी अपेक्षा पुनाळकर यांनी पत्रात व्यक्त केली हाेती. तसेच सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातील एकमेव साक्षीदार पाेलिस कर्मचारी रवी पाटील याच्या मृत्यूनंतर खटल्याचे काय झाले? याकडेही पत्राद्वारे पाेलिसांचे लक्ष वेधण्यात अाले हाेते.

दरम्यान, या प्रत्यक्षदर्शी असलेल्या शाळकरी मुलाला पोलिस संरक्षण कसे द्यायचे या विचारात या मुलाचे कुटुंबीय अाहेत. या खून खटल्यात कोणीही साक्षीदार माहिती देण्यासाठी पुढे येत नसताना मारेकऱ्यांची दुचाकी आपल्या सायकलला धडकल्याचे पाेलिसांना सांगण्याचे धाडस या मुलाने दाखवले हाेते. तसेच कळंबा कारागृहात झालेल्या अाेळख परेडमध्ये त्याने संशयित समीर गायकवाडला अाेळखलेही हाेते.

मेधायांनी घेतली भेट
या पार्श्वभूमीवर समीरच्याच वकिलांनी पाेलिसांना असे पत्र पाठवणे म्हणजे यामागे ‘साक्षीदाराची खरेच काळजी अाहे का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे. दरम्यान, पुनाळकर यांनी पाठविलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मेधा पानसरे अॅड. दिलीप पवार यांनी पाेलिस अधीक्षकांची मंगळवारी भेट घेतली साक्षीदाराच्या सुरक्षेबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली. त्यावर अधीक्षक देशपांडे यांनी सदर मुलाच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे अाश्वासन दिले.