आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pansare Murder Case: Strong Evidence Against Samir

पानसरे हत्या प्रकरण: समीरविरोधात भक्कम पुरावे; शुक्रवारी पुन्हा कोर्टासमोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने संशयित समीर गायकवाड याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यात लंडनहून सॅटेलाइटद्वारे घेण्यात आलेल्या माहितीचा समावेश आहे, तर ठाण्यातून हल्ल्यावेळी वापरलेली दुचाकी आणि पिस्तूल याबाबतही काही धागेदोरे सापडल्याचे समजते.

समीरची न्यायालयीन कोठडीची मुदत २३ ऑक्टोबरला संपते आहे. त्यामुळे शुक्रवारीच त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटक केल्यापासून ९० दिवसांत त्याच्यावर आरोपपत्र दाखल करणे अत्यावश्यक असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने सर्व प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे. तपासात मिळालेल्या प्रत्येक माहितीची छाननी आणि त्या माहितीचा या प्रकरणाशी असलेला संबंध या पद्धतीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने हा तपास केल्याने अनेक बाबी या समीर याच्याविरोधात असल्याचे समजते.

समीरच्या सांगलीतील घरातून जप्त केलेले मोबाइल हँडसेट, सीमकार्ड, प्रत्यक्ष घटनास्थळाची माहिती आणि त्याची लंडनमधून सॅटेलाइटच्या माध्यमातून करून घेण्यात आलेली खातरजमा, तो ठाण्यात जिथे वास्तव्यास होता तेथून घेतलेली माहिती ही या प्रकरणावर आणखी प्रकाश टाकू शकेल, असा विश्वास पोलिसांना आहे.