आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातन प्रभावातूनच हत्या, पानसरे हत्याप्रकरणी ‘समीर’वर आरोपपत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संशयित आरोपी समीर गायकवाड - Divya Marathi
संशयित आरोपी समीर गायकवाड
कोल्हापूर - सनातनच्या वैचारिक प्रभावातूनच ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट समीर गायकवाड आणि त्याच्या अज्ञात सहकाऱ्यांनी रचला असल्याचे ३९२ पानी आरोपपत्र कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दाखल केले. त्यात ७७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. १६ फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरेंची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर कोल्हापूर पोलिस आणि विशेष चौकशी पथकाने १६ सप्टेंबर रोजी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडला सांगलीत अटक केली. अटकेच्या ८९ व्या दिवशी १४ डिसेंबर रोजी न्यायमूर्ती डांगे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात ३०२, ३०७, ३२० ब ३४ ही कलमे लावण्यात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...