आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहसी क्रीडा संस्थांसाठी नोंदणी सक्तीची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कुणीही उठावं आणि गडकोट किल्ले भ्रमंती मोहिमांचे आयोजन करावं, कुणीही गिर्यारोहण मोहिमा आखाव्यात याला आता बंधन घालण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. जमिनीवरील, पाण्यातील आणि हवेतील अशा साहसी खेळांचे आयोजन करणार्‍या संस्थांना आता नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सात वर्षांपूर्वी हिमालयातील एका गिर्यारोहण भ्रमंतीदरम्यान एका युवकाचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू झाला होता. यानंतर या युवकाच्या आई वडिलांनी 2007मध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात 12 जुलै 2013 रोजी न्यायालयाने शासनाला याबाबत दक्षता घेण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने 26 जून रोजी हा अध्यादेश काढला आहे.

टेÑकिंग, माऊंटनिअरींग, स्किर्इंग, स्रेबोर्डिंग, पॅरासेलिंग, हॅग्लायडिंग, पॅराग्लायडिंग,जलक्रीडा आदी साहसी खेळांचे विविध संस्था आणि वैयक्तिक पातळीवर आयोजन केले जाते. परंतु अशावेळी अनेकदा सुरक्षेची दक्षता घेतली जात नाही. साधन सामुग्री अपुरी असते. प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसते. त्यामुळे अशा मोहिमा काही जणांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना घडतात. त्याला आळा घालण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे. जिल्हास्तरीय समितीकडे 1000 रूपये भरून अशा आयोजक संस्थांनी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून यानंतरच अशा मोहिमांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येईल. अन्यथा भारतीय दंड संहिता, मुंबई पोलिस अधिनियम व ग्राहक संरक्षण
अधिनियमातंर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

अशी असेल समिती
जिल्हा क्रीडाधिकारी (अध्यक्ष), प्रादेशिक व्यवस्थापक पर्यटन विभाग (सदस्य), जमीन, हवा, पाणी या क्रीडा प्रकारातील प्रत्येकी दोघे (सदस्य). क्रीडा आयुक्तांच्या अध्यक्षतेखालीही एक शिखर समिती कार्यरत केली जाणार आहे. पर्यटन विभागाचे सहव्यवस्थापक आणि तज्ज्ञ 6 व्यक्ती या समितीच्या सभासद असतील. मोहिमेचे आयोजन करणार्‍या संस्थेकडे, व्यक्तीकडे संबंधित खेळातील प्रशिक्षण घेतलेले अधिकृत संस्थेचे प्रमाणपत्र गरजेचे असून प्रथमोचाराचे प्रमाणपत्र घेणारी व्यक्तीही अशा मोहिमेत सोबत ठेवणे बंधनकारक आहे. समुद्र किनारे आणि मोठ्या तलावांच्या ठिकाणी विविध जलक्रीडा, पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहण आणि किल्ले भ्रमंतीच्या मोहिमा आखल्या जातात.या सर्व मोहिमांत सहभागी होणार्‍यांचे संरक्षण होण्यासाठी या निर्णयामुळे मदत होणार आहे.