आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patangarao Kadam News In Marathi, Vishwajit Kadam, Congress, Divya Marathi

पतंगराव कदमांचे लक्ष सांगलीपेक्षा पुण्याकडेच, विश्वजितच्या निवडणूक विजयासाठी प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - पालकमंत्री या नात्याने सांगली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेल्या वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे सर्व लक्ष सध्या पुणे लोकसभा मतदारसंघावर असल्याचेच दिसून येते. त्यांचा मुलगा व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना कॉँग्रेसने पुण्यातून उमेदवारी दिली असून त्यांच्या विजयासाठी पतंगरावांनी आपले सर्व लक्ष पुण्यावर केंद्रित केल्याचे दिसून येते.


काँग्रेस पक्षाने निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आपल्या वाट्याच्या मतदारसंघांची जबाबदारी संबंधित पालकमंत्र्यांवर सोपवली आहे. पतंगराव हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे येथील उमेदवार केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांच्या विजयाची प्रमुख जबाबदारी कदम यांच्यावरच पक्षाने सोपवली आहे. तसेच सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पुण्याचीही काही जबाबदारी कदमांवर पक्षाने सोपविली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पतंगरावांचे लक्ष पुण्यावरच असल्याचे दिसून येते. आपल्या मुलाला, विश्वजितला पक्षाची पुण्यातून उमेदवारी मिळवून देण्यात तर ते यशस्वी ठरले आहेत. आता त्याच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी पतंगराव कदम शहरात आले होते.


पीक विम्याचा पुनर्विचार
गारपीटग्रस्त शेतक-यांना निकषांपलीकडे जाऊन मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना पतंगराव म्हणाले, ‘पीक विम्याच्या भरपाईच्या रकमा शेतक-यांना देताना विमा कंपन्या टाळाटाळ करतात. त्याबाबत प्रचंड नाराजी आहे. या कंपन्यांवर सरकारचे नियंत्रण राहील, असा बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी विम्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे.’