सांगली - ‘यावेळची विधानसभा नविडणूक माझ्यासाठी शेवटची असेल. पुढे अन्य नविडणुका लढवायच्या की नाही, याचा निर्णय भविष्यात घेतला जाईल’, असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आघाडीच्या नेत्यांनी ही नविडणूक सामंजस्याने लढवावी, अन्यथा काही जणांना घरी बसावे लागेल किंवा ‘आत’ जावे लागेल, असे परखड मतही त्यांनी मांडले.
यावेळी कदम यांनी गेल्या पाच वर्षांत मदत व पुनर्वसन कार्य आणि वनमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. ‘गेल्या पाच वर्षांत वनमंत्री म्हणून अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. कुंडल येथे राज्यातील पहिली व देशातील पाचवी वन अकादमी सुरु केली. सात हजारहून अधिक वनमजुरांना सेवेत कायम करण्याचा निर्णय घेतला. वन्यजीवांच्या हल्लयात जीवीत हानी झाल्यास पाच लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला. राज्यात पडलेल्या दुष्काळात दुजाभाव न करता हजारो कोटी रुपयांची मदत दिली. सिमेंट बंधारे बांधून कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले.’
विधानसभेची ही नविडणूक शेवटची असल्याचे सांगून कदम म्हणाले, ‘यापुढे अन्य कोणती नविडणूक लढवायची की नाही, हे नंतर ठरवू. काँग्रेसच्या सक्रीय राजकारणातही मात्र सहभाग राहीलच.’
पाचदा विजय, तीनदा पराभव
पतंगराव कदम १९६७ मध्ये एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांनी १९८० साली पहिल्यांदा विधानसभा नविडणूक अपक्ष लढवली. ही नविडणूक हरल्यानंतर पुन्हा जोमाने काम करत १९८५ व १९९० ची नविडणूक त्यांनी जिंकली. त्यानंतर १९९५ आणि १९९७ ला झालेल्या पोटनविडणुकीत त्यांचा पराभव झाला. कदम यांनी आजवर लढवलेल्या आठपैकी तीन नविडणुकांत पराभव झाला. त्यांचा मुलगा विश्वजित यांचाही नुकत्याच झालेल्या लाेकसभा नविडणुकीत पुण्यातून पराभव झाला.
आता देशमुखांचे आव्हान
सांगली जिल्ह्यातील पलूस हा पतंगरावांचा मतदारसंघ. यावेळीही ते शेवटची नविडणूक याच मतदारसंघातून लढवणार आहेत. १९९७ च्या विधानसभा पोटनविडणुकीत कदम यांचा पराभव करणारे पृथ्वीराज देशमुख हे सध्या राष्ट्रवादीत असून, लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत. पतंगरावांसमोर पुन्हा देशमुखांचेच आव्हान असेल. त्यामुळे कदमांची शेवटची नविडणूक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.