आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाटील खून प्रकरणाची सीआयडीकडे तपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - पाचगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील यांच्या खुनाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. शुक्रवारी दुपारी याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे कार्यकर्ते अशोक पाटील यांचा बुधवारी दुपारी गोळ्या घालून कोल्हापुरात खून करण्यात आला होता. यानंतर याप्रकरणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नावासह फिर्याद घ्यावी यासाठी पाटील यांच्या समर्थकांनी गुरुवारी पहाटेपर्यंत प्रेत

ताब्यात घेतले नव्हते. या पार्श्वभूमीवर पोलिसांची चार पथके तपासासाठी रवाना करण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य, आरोप, प्रत्यारोप आणि तणावाची परिस्थिती पाहून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, पाटील यांचे नाव गोवण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या वतीने शहरात निदर्शने करण्यात आली.

दोघांत पॉलिटिकल वॉर
सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्याविरोधात भीमा साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी निवडणूक लढवली. अतिशय अटीतटीच्या लढतीत बंटी यांनी बाजी मारली. परंतु त्यानंतरही या दोघांमधील ईर्षेच्या राजकारणाने टोक गाठले आहे. कार्यकर्त्यांना चेपणा-या सतेज पाटील यांना कायम विरोध राहील, असा पुनरुच्चार धनंजय महाडिक यांनी केला होता.