आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लकी ड्रॉ मध्ये जिंकलेली कार घरी नेताना जिंकलेल्याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- चार चाकी गाडीच स्वप्नं आयुष्यभर पाहिलं..…अखेर एका वस्त्रांच्या दुकानाने दिवाळीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या लकी ड्रॉ द्वारे नशिब फळफळले आणि चार चाकीचे स्वप्न पूर्ण ही झालं ... चार चाकी गाडी ताब्यात घेतली आणि हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने याच कार विजेत्या दिलीप कांबळे यांचा मृत्यू झाला.  या घटनेने कुटुंबातील सदस्यांचा आनंद दुःखाच्या सागरात मावळून गेला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील चंद्रकांत कांबळे....  एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व  अशी त्यांची गावात ओळख , खरं तर त्यांच्या गावात लकी ड्रॉचं पहिलं कुपन लागलेल्या अल्टो कार सोबत त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर झळकणार होते.. मात्र दुर्दवाने त्यांना श्रद्धांजली वाहणारे पोस्टर्स लावण्याची वेळ त्यांच्या गावकऱ्यांवर आणि मित्र परिवारांवर आली आहे.


नुकत्याच झालेल्या दिवाळीत चंद्रकांत कांबळे यांनी आपल्या कुटुंबियांना समवेत एका कपड्यांच्या दुकानातून 1 हजार रुपयांची खरेदी केली होती. तिथं त्यांनी लकी कुपन ड्रॉ मध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर ही गोष्ट ते विसरूनही गेले होते. 15 दिवसांपूर्वी या लकी ड्रॉ चा निकाल लागला आणि चंद्रकांत कांबळे यांना अल्टो कारचं.पहिलं बक्षीस लागले.


बक्षीस मिळाल्याची माहिती दुकानाच्या व्यवस्थापनाने कांबळे यांना फोन करून सांगितली. हा फोन झाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेना. कांबळे यांनी आपल्या सर्व मित्रपरिवाराला आपल्याला स्वप्नातील चार चाकी मिळणार असल्याची माहितीही दिली. या आनंदात दिलीप कांबळे गेले 4 दिवस होते. बक्षीस लागलेली कार ताब्यात घेण्यासाठी आरटीओ, इन्शुरन्स आणि इतर गोष्टीसाठी दीड लाख रुपये खर्च अपेक्षित होता. यासाठी त्यांनी मित्रांच्या कडून पैशाची जुळवाजुळव केली आणि आपल्या स्वप्नातील कार घेण्यासाठी ते तयार झाले. 25 तारखेला सायंकाळी 7 वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते त्यांना कारची चावी देण्यात आली.  कार्यक्रमाला ते आपल्या मित्रपरिवारासह उपस्थित होते. त्यांनी खासदारांच्या हस्ते गाडीची चावीही घेतली. कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या परिवाराला घेऊन वडणगे गावाच्या दिशेने रवाना झाले. सर्वजण आनंदात होते. आणि या आनंदातच अचानक कांबळे यांच्या छातीत कळ आली आणि ते अस्वस्थ झाले.

 

तातडीने उपचारासाठी नेले पण...

कुटुंबियांनी त्यांना ताबडतोब उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. दिलीप कांबळे यांची प्राणज्योत मालवली. आयुष्यभर चंद्रकांत कांबळे यांनी प्रामाणिकपणे काबाडकष्ट केले.. आणि चार चाकी गाडीचं स्वप्न पाहिले .. ती मिळालीही खरी.. पण त्या गाडीचा आनंद त्यांना घेता आला नाही. त्यांच्या चार चाकीचं स्वप्न पूर्ण होऊन देखील अधुरच राहीलं. चंद्रकांत यांच्या जाण्याने संपूर्ण वडणगे गावावर शोककळा पसरली. चंद्रकांत कांबळे यांना लकी ड्रॉ मध्ये मिळवलेल्या बक्षिसांसाठी तयार केलेले बॅनर लावण्या ऐवजी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. या घटनेमुळे प्रत्येकाच्याच काळजाचा ठाव घेतला असून कोल्हापूर जिल्हा सुन्न झाला आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...