आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍ली - मुंबई नव्‍हे हा तर कोल्‍हापूरचा 'रंकाळा', पाहा रमनीय PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूर - कधी नव्‍हे ते यंदा ऑगस्‍टच्‍या पहिल्‍याच आठवड्यात कोल्‍हापूरचा रंकाळा कोठोकाठ भरला असून, त्‍याचे सौंदर्य नरजेच्‍या टापूत टिपण्‍यासाठी कोल्‍हापूरकर एकच गर्दी करत आहेत. छायाचित्रकार आशिष लोलगे आणि अक्षय ओस्‍वाल यांनी रंकाळ्याच्‍या विविध छटा आपल्‍या कॅमेऱ्यात कैद केल्‍या. ऋषब ओस्‍वाल यांनी हे फोटो 'कोल्‍हापूर' या फेसबुक पेजवर शेअर केले. त्‍यावर लाइक्‍स् चा वर्षाव होत आहे.
कोल्हापूरची चौपाटीच
कोल्हापूर म्‍हटले की आपसुकच डोळ्यासमोर दिसतो तो रंकाळा. या रमणीय ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कोल्हापूरमधील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने फिरावयास जातात. कोल्हापूरची चौपाटी म्‍हणूनही रंकाळा ओळखला जातो.
कशी झाली रंकाळ्याची निर्मिती
पूर्वीच्या काळी येथे एक मोठी दगडाची खाण होती. इ.स. 800 ते 900 च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले. या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला. या तलावाजवळच रंकभैरव या श्री महालक्ष्मी देवीच्या रक्षकाचे मंदिर आहे. त्यांच्या नावावरनच या तलावास रंकाळा हे नाव पडले. पुढे शिवाजी महाराजांनी या तलावाचे रुपच बदलले. वर्ष 2010 मध्‍ये येथे काही बदल करून हा परिसर नयनरम्य करण्यात आलेला आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, रंकाळ्याचे मनोवधक फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)