आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर, अधिकार्‍यांविरूध्द गुन्हा; काविळीच्या साथीने 24 जणांचे मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - मागील काही दिवसांपासून कावीळीच्या साथीने जिल्ह्यात थैमान माजवले आहे. दूषित पाण्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातल्या तब्बल २४ जणांना जीव गमवावा लागला आहे. अखेर या प्रकरणावर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे.
इचलकरंजी नगरपालिकेच्या नगरअध्यक्षांवर, मुख्याधिकार्‍यांवर आणि जलअभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे पंचगंगेचे पाणी दूषित झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.