आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Every Decision, Every Thought Must Be Criticised. There Must Be Samvad And Vivad: PM Narendra Modi

देशाच्या प्रगतीसाठी विधायक टीकाही आवश्यक, फक्त आरोप नकोत- नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- विधायक टीकेमुळेच लोकशाही मजबूत होत असते. मात्र, सध्या दुर्दैवाने केवळ आरोप होत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी विधायक टीकाही आवश्यक आहे. माध्यमांकडूनही हीच अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. दैनिक 'पुढारी'च्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मोदी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्वकालीन पत्रकारिता ही स्वातंत्र्यासाठीच्या ध्येयाने प्रेरित होती. विदेशी शक्तीविरोधात बिगुल वाजवण्याची भूमिका या माध्यमांनी घेतली. त्या वेळीही अनेक आव्हाने या वृत्तपत्रांसमोर होती. मात्र, त्यातूनही त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. विशेषत प्रादेशिक वृत्तपत्रांनी ही भूमिका अतिशय चोखपणे बजावली. आणीबाणीच्या काळाचा संदर्भ देत मोदी यांनी वृत्तपत्राच्या विश्वसनीयतेबद्दल भाष्य केले. सर्वसामान्य वाचक कोणी काय सांगतो यापेक्षा वृत्तपत्रात काय छापून येते याला अधिक महत्त्व देतो. त्यामुळे वृत्तपत्रांनी विश्वासार्हता निर्माण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
टोलबाबत निर्णय घेऊ- सीएम
कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांबाबत सकारात्मक सरकार सकारात्मक आहे. लवकरच कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील निर्णय होईल असे सांगत टोलमुक्तीचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिले.
आणखी पुढे वाचा...