आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाने लग्नास नकार दिल्याने मुलीने दिली पोलिसाकडे तक्रार, त्यानंतर घडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो. - Divya Marathi
सांकेतिक फोटो.
कोल्हापूर- प्रेम प्रकरणात युवकाने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर एका युवतीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार अर्जाची चौकशी करण्याकामी युवकाला बोलावून हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसाने लाच मागितली. 10 हजाराची लाच मागणाऱ्या आणि तडजोड करून 5 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या राजारामपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल किरण गवळी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी विलास मारुती चौगले यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
 विलास चौगले यांच्या मित्राच्या भावाचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र त्याने त्या मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्याने मुलीने विलास चौगले यांना संपर्क साधून त्या मुलास आपल्याशी लग्न करावयास सांगण्याची विनंती केली. मात्र यामध्ये कोणतीही तडजोड झाली नाही.
 अखेर त्या मुलीने किरण गवळी यांच्याकडे विलास चौगले यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. चौकशी करण्यासाठी विलास चौगले यांना पोलिस ठाण्यात बोलावून तुझ्याविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याची संबंधित मुलीने तक्रार दिली आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी 10 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले.
 
विलास चौगले यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून किरण चौगले यांच्या विरोधात तक्रार दिली. 10 हजारावरून 7 हजाराची तडजोड आणि त्यानंतर 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज एसीबीने कॉन्स्टेबल किरण गवळी याला रंगेहात पकडले. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...