आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Do Narco And Brain Mapping Test Of Samis Gayakwad

समीर गायकवाडची पोलिस नार्को, ब्रेन मॅपिंग चाचणी करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडची नार्को टेस्ट तसेच ब्रेन मॅपिंग करण्याचा निर्णय विशेष चौकशी तपास पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. समीर तपासात असहकार्य करत असल्याने त्याच्याकडून माहिती उकलण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
समीर गायकवाड हा सध्या पोलिस कोठडीत आहे. चौकशीत तो पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना अपेक्षित उत्तरे देत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे, त्याच्याकडून सत्य उकलण्यासाठी नार्को टेस्ट करण्याचा व ब्रेन मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, समीर अजून दोन दिवस पाेलिस काेठडीत अाहे. या काळात त्याला ठिकठिकाणी फिरवण्यापेक्षा तो जी माहिती देईल, ज्यांची नावे घेईल त्यांनाच समीरसमाेर अाणण्याचा प्रयत्न पोलिस करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रूद्र पाटील पळाला नेपाळमध्ये?
मडगाव बॉम्बस्फोटातील संशयित फरार आरोपी रूद्र पाटील हा नेपाळमध्ये असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे त्याच्या शोधासाठी अधिकाऱ्यांचे एक पथक नेपाळला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. हिंदू धर्मासाठी काम करत असलेल्या सनातन संस्थेचा साधक असलेला रूद्र हा नजीकचे बहुसंख्य हिंदू संख्या असलेल्या नेपाळमध्ये आश्रय घेऊ शकतो. त्याच्या याआधीच्या फोन कॉल्सवरून तो तिकडे असावा असा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचाही कयास आहे.