आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Has Not Control On Crime, Chandrakant Patil Targeted Cm Depertment

पाेलिसांचा वचक राहिला नाही,मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर चंद्रकांत पाटलांचा निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - ‘पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने तुरुंगातून कैदी पळून जात आहेत. अशा घटना का घडत आहेत, याचा पोलिस प्रशासनाने विचार करण्याची वेळ आली आहे’, असे वक्तव्य करून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी थेट मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृह विभागावरच निशाणा साधला.

तासगाव तालुक्यातील तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात उभारण्यात येणा-या प्रेरणा किल्ल्याचे भूमिपूजन आणि नक्षत्रवन कुटीचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

एकाच मंत्र्याकडे अनेक खाती असल्याची टीका विरोधक करत असतानाच भाजपचेच ज्येष्ठ मंत्री पाटील यांनीही थेट मुख्यमंत्र्यांचे खातेच निशाण्यावर घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरसह सांगली जिल्ह्यात तुरुंगातून गुन्हेगार पळून जाण्याच्या सलग घटना घडल्या. याचा संदर्भ देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘‘पोलिस हा जनतेला आपला मित्र वाटला पाहिजे; तर समाजविघातक प्रवृत्तींवर त्याची जरब असली पाहिजे, अशा प्रशिक्षणावर येथील केंद्रात भर दिला जावा. गुन्हेगारी आणि माफिया राज यांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त केला पाहिजे; पण तसे होताना दिसत नाही. पोलिसांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक राहिला नाही, त्यामुळेच गुन्हेगार तुरुंगातून पळून जाण्याचे धाडस करत आहेत. माफियाराजही फोफावला आहे.’

पुढे वाचा, आबांचे कौतुक