आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाेलिस मेजवानीत दंग, तीन दराेडेखाेरांचे पलायन - तासगाव ठाण्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानंतर पाेलिस कर्मचारी मेजवानीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून तीन दराेडेखाेरांनी पाेलिस ठाण्यातून पलायन केले. ही घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे रविवारी रात्री घडली. मध्यरात्री सुरू झालेल्या वादळी पावसाचा फायदा उठवत या अाराेपींनी ड्यूटीवरील पाेलिसांच्या डाेळ्यात धूळफेक करत पलायन केल्याचे समाेर अाले अाहे. दरम्यान, याप्रकरणी दाेन पाेलिसांना निलंबित करण्यात अाले अाहे.

तासगावातील पोलिस निरीक्षकासह काही कर्मचाऱ्यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्काराचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम रात्री साडेनऊला संपला. त्यानंतर सर्व पोलिस कर्मचारी एका मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या मेजवानीला गेले. रात्री बाराच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यात वीजही गेली. या साऱ्या परिस्थितीचा फायदा उठवत कोठडीत असलेल्या कुमार बदू पवार, राहुल लक्ष्मण माने, राजेंद्र प्रेमनाथ जाधव या तीन आरोपींनी कोठडीचा दरवाजा आणि छत यामध्ये हवेसाठीच्या असलेल्या जागेतून उड्या मारून पलायन केले. डिसेंबर २०१० मध्ये तासगाव पोलिस ठाण्यातूनच तीन आरोपींनी पलायन केले होते. त्या वेळी तीन पोलिस निलंबित झाले होते.