आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगलीत पोलिस निरीक्षकाची स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या; नैराश्य आल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- सांगली येथे एका पोलिस निरीक्षकाने सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सखाहरी गिरजप्पा गडदे (वय 49) असे त्यांचे नाव आहे. 
 
गडदे हे 27 वर्षांपासून पोलिस सेवेत होते. सध्या ते सांगली पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होते. आज पहाटेच्या सुमारास देवल कॉम्प्लेक्समधील राहत्या घरी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. नोकरीत प्रमोशन मिळत नसल्याने गडदे यांना नैराश्य आले होते. या मानसिक तणावातूनच त्यांनी स्वत:ला संपवले असावे, असा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...