आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस मारहाणीत मुलाचा मृत्यू; पित्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- गाड्यांची बोधचिन्हे चोरल्याच्या संशयावरून पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कैलास गवळी यांनी केला. या प्रकरणावरून मंगळवारी सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते.

चारचाकी गाड्यांची बोधचिन्हे अनिकेत कैलास गवळी (वय 22, रा. सातारा) याने चोरल्याचा पोलिसांना संशय होता. त्याला ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता अनिकेतने पळ काढला. पोलिसांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. जिल्हा न्यायालयाजवळ असलेल्या सिमेंटच्या पाइपवरून पळताना अनिकेतचा तोल गेला आणि तो पडला. त्याच्या मेंदूला गंभीर मार लागला. पोलिसांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांचे म्हणणे आहे, तर पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच अनिकेतचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या वडिलांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. अखेर पोलिस अधिकारी रवींद्र पिसाळ यांनी चौकशीचे आश्वासन दिल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.