आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Trying To Make Sketch Of Attakers Who Attacked Govind Pansare

उमा पानसरे यांनाही लागली होती गोळी, हल्लेखोरांबाबत दिली माहिती, स्केच बनवणे सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि डाव्या चळवळीतील आघाडीचे नेते गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उमा पानसरे यांनी पोलिसांना माहिती दिली आहे. उमा यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हल्लेखोरांचे स्केच बनवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, या हल्ल्यात उमा यांनाही गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. उमा यांना गोळी लागली नव्हती तर त्या कोसळल्याने जखमी झाल्या होत्या अशी माहिती याआधी समोर येत होती.
(फाइल फोटो - गोविंद पानसरे)

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतलेल्या पाच संशयितांना चौकशी नंतर सोडून देण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तपासाबाबत कोणतीही माहिती पोलिस प्रसारमाध्यमांना देण्यास तयार नाहीत. उमा पानसरे शुद्धीवर आल्यानंतर स्वतः पोलिस अधिक्षकांनी त्यांना या प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हल्लेखोरांचे स्केच तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहितीही मिळाली आहे. त्याचप्रमाणे गोविंद पानसरे यांना याआधी धमकीची काही पत्रे मिळाली होती. पोलिसांनी त्यादिशेनेही तपासाला सुरुवात केली आहे.

दुसरीकड गोविंद पानरसे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले आहे. पानसरे हे उपचाराला प्रतिसाद देत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याचबरोबर गरज भासल्यास त्यांना आणि उमा पानसरे यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्याची आपली तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.