आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Political News In Marathi, Solapur, Ajit Pawar, Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री चव्हाण, पालकमंत्री कदमांकडे शरद पवारांनी फिरवली पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी तालुक्यांना फायदेशीर ठरणार्‍या टेंभू उपसा सिंचन योजनेतील तिसर्‍या टप्प्याच्या उद्घाटनाला रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दीड डझन मंत्री हजर राहणार होते. मात्र पाटबंधारे मंत्री शशिकांत शिंदे वगळता राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्र्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तसेच पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या कारखान्याच्या कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती नसल्याने राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांनीही जाणे टाळले.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, रोजगार हमी मंत्री सुरेश धस आदी नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हय़ात येणार्‍या शरद पवार यांची वेळ घेऊन वनमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीही त्यांच्या सोनहिरा साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पाचे उद्घाटनही याच दिवशी ठेवले होते. मात्र पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या दोन्ही कार्यक्रमांना आले नसल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. शरद पवारच उपस्थित राहणार नसल्याने अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या अन्य मंत्र्यांनीही या दोन्ही कार्यक्रमांकडे पाठ फिरवली.

जिल्हय़ातील नेतेही गैरहजरच
जिल्हय़ातील नेते आर.आर. पाटील भंडार्‍याच्या दौर्‍यावर असल्याचे सांगण्यात आले. तर वाढदिवस असल्याने मतदारसंघातच असलेले जयंत पाटील यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या व पतंगरावांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेस- राष्ट्रवादीतील या ‘बेकी’ची चांगलीच चर्चा होती. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांसह कॉँग्रेसचे अर्धा डझन मंत्री व आमदार उपस्थित होते.